Wednesday 20 June 2012

पद्मदुर्ग शिवरायांची सागरी दौड . . .




सिद्याच्या जंजिर्याला शह देण्यासाठी शिवप्रभूनी पद्मदुर्गाची उभारणी केली.जंजिर्याचा दुर्ग इ. सन १५६७ ते १५७२ या दरम्यान बांधला गेला.आधी निजामशाही आणि नंतर मुघल यांच्या आधीन असणारया सिद्द्यानी या बळकट,कुबल दुर्गाच अजिंक्यत्व कायम राखल.मराठ्यांनी वारंवार हल्ले चढवूनही त्यांना जंजिरा घेता आला नाही.
जझीरा म्हणजे बेट.'जंजिरा' हा त्याचा मराठी अपभ्रंश पाण्यातील बेटावरील दुर्गासाठी वापरला जातो.जंजिर्याचे नाव आहे 'माहरुबा'. माह म्हणजे चंद्र आणि रुबा म्हणजे चतकोर! मुरुड जवळच्या बेटावरील हा दुर्ग एकवीस बुरुजांनी बंदिस्त केला आहे.काही बुरुज प्रचंड आहेत.या बुरुजांवरच्या अनेक मोठ्या तोफांनी जंजीरयाच अभेद्यत्व कायम ठेवलं होत.शिवाजीमहाराजांनी कोकणपट्टीवरील अनेक दुर्ग ताब्यात आणून आणि स्वराज्याच आरमार तयार करून सिद्याच्या कोकणातील अत्याचारांना मोठाच आळा घातला होता;पण जंजिरा आपल्या ताब्यात आणण्यास मात्र त्यांना यश आल नाही.

शेवटी जंजीरयावर दबाव रहावा म्हणून त्याच्यापासून दूर समुद्रात असणारया एका छोट्या बेटावर शिवप्रभूनी एक दुर्ग बांधावयास काढला.मुरूडच्या किनार्यावरून हे बेट दिसते.त्याचे नाव आहे कांसा.या कांसा बेटावर मराठी स्थपती दुर्ग उभारणीच काम करू लागले.सिद्दी या बेटावर हल्ले चढवतील म्हणून दर्यासारंग आणि दौलतखान यांना आरमार घेऊन बेटाच्या मदतीला पाठविण्यात आले.शिवप्रभूनी हा दुर्ग बांधला.
पुढे हा सिद्द्यानी जिंकून घेतला.त्या पद्म्दुर्गाचा मूळचा काही भाग पडून सिद्द्यानी त्यावर त्यांच्या शैलीतील बांधकाम केले.मराठी आणि सिद्दी यांच्या बांधकाम शैलीतील फरक पद्म्दुर्गावर लगेचच कळून येतो. पद्मदुर्गाचे मग वैशिष्ट्य काय आहे?

जंजिरा आणि पद्मदुर्गावर एक गंमत पहावयास मिळते.येथे दगड चुन्यात बसवले आहेत आणि चुन्याचे थरही जाड आहेत. या दोन्ही दुर्गांवर एक गोष्ट पहावयास मिळते ती म्हणजे सागराच्या लाटांच्या मारामुळे बरयाच ठिकाणी तटबुरुजांचे दगड झिजले आहेत.झिजून वीत दोन विती आत गेले आहेत;पण त्यांना जखडून ठेवणारे चुन्याचे ठार मात्र तसेच आहेत.ते काही झिजलेले दिसत नाहीत.पूर्वी चुना उत्तमरीत्या मळून,तो ठराविक वेळातच वापरात असत.त्यामुळे चुन्याचे पकडीचे गुण वाढत असत.चुण्यावर हवामानाचा आणि लाटांचा मोठा परिणाम झालेला दिसत नाही.आज चार-पाचशे वर्षे तरी चुना तसाच टिकूनआहे.


No comments:

Post a Comment