Wednesday, 20 June 2012

अर्नाळा शनिवारवाड्याची प्रतिकृती ..




वैतरणा नदी जेथे सागराला मिळते तेथे एका वेगळ्या बेटावर एका दुर्गाची बांधणी करण्यात आली आहे.या दुर्गाचे नाव आहे अर्नाळा! ज्या बेटावर हा दुर्ग वसला आहे त्या बेटाचे नावच दुर्गाला देण्यात आले आहे.सिंधुदुर्ग आणि अर्नाळा हे दोन्ही दुर्ग बेटांवर असले तरी त्यांच्या रचनेत मोठा फरक आहे.सिंधुदुर्ग हा संपूर्ण बेत व्यापून राहिला आहे,तर अर्नाळा बेटावरच्या काही भागात बांधला आहे.अर्नाळासंबंधी म्हंटले आहे कि 'त्यास विचार पाहता आर्नालीयासारखी जागा दुसरे कोठे नाही.चहूकडील आरमारास मार्ग,खाडी मनोरे-मांडवीपोवतो गेली आहे.ते स्थल जालिया,दुसरा जंजिरा,फिरंगानदेखील हस्तगत होते.'

उत्तर फिरंगानात अर्नाळ्याचा दुर्ग बाजीराव पेशव्यांनी बांधला.बेटावर प्रत्येक बाब किनार्यावरून आणावी लागे.तीनचारशे लोक याच कामास लागले होते.एके ठिकाणी नोंद आहे-'बुरुज तीन. बहिरव,भवानी,बाबा यैसे तीन बुरुज जमिनीपासून उंच.बाबा बुरुज काम दोन गज जाले.दोनही बुरुज पायापासून नव हात जमिनीबरोबर काम आहे....!'

असा अर्नाळा दुर्ग उभा राहिला.अर्नाळा हि पुण्याच्या शनिवारवाड्याची प्रतिकृती आहे.शनिवारवाडा हा नऊबुरुजी कोट आहे,तर अर्नाळा दहाबुरुजी आहे.अर्नाल्याचे प्रवेशद्वार देखणे आहे.द्वारावर चांगली सूचक द्वारशिल्पे आहेत.दरवाजावरच बाजीराव पेशव्यांच्या नावाचा एक शिलालेख आहे.२३ मे १७३७ रोजी या कोटाचे काम पूर्ण झाल्याचा त्यात उल्लेख आहे.

अर्नाल्याच्या तटाची उंची १० मीटर आहे.तटाची रुंदी तीन मीटर आहे.आत दत्तमंदिर आहे.

एका पोर्तुगीजाने लिहिले आहे-'मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसई प्रांत जिंकून घेतल्यावर लगेच वसई व अर्नाळा येथे आपले आरमार उभारले व विजयदुर्ग ताब्यात घेतल्यापासून तीन ठिकाणी मराठ्यांचे आरमारी तळ झाले आहेत.'

अर्नाळ्याचा हा कोट पूर्ण बेटावर बांधला नसल्याने बेटावर शत्रू उतरून कोटाकडे येण्याची शक्यता होती.या बेटावर त्यासाठी टेहालनिसाठी आणि क्वचित तोफांचा मारा करण्यासाठी एकांडा टेहालणी बुरुज बांधलेला आहे.युरोपच्या किनारपट्टीवर असे प्रचंड बुरुज आढळतात.अशा बांधकामाला तिकडे 'मोर्ट्रेलो टोवर' म्हणतात.असे एक आगळेवेगळे बांधकाम अर्नाळा बेटावर आहे.ते अभ्यासण्यासारखेआहे.


No comments:

Post a Comment